भंडारदरा : कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला.अनेक शाळा, महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ असल्यामुळे या पर्यटन स्थळावर पुणे, मुंबई, नाशिक इतर राज्यातून तसेच विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. खबरदरीचा उपाय म्हणून भंडारदरा पर्यटन स्थळ व अभयारण्याच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. टेंटधारकांना काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बारी ग्रामपंचायत, मुरशेत ग्रामपंचायत यांनी वन्यजीव विभागाकडे ठराव दिले आहेत. पांजरे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, पेंडशेत आदी ग्रामपंचायती ठराव देणार आहेत. मुरशेत गावचे माजी सरपंच अशोक गोलवड, देवराम गांगड यांनी वन्यजीव विभागाचे डी. डी. पडवळ यांना ठराव दिला.
कोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 3:25 PM