राहुरी : मधूमेह असलेला एक रुग्ण राहुरी तालुक्यात रक्ताची चाचणी करणाराकडे गेला. त्या रुग्णांचे तपासणीसाठी रक्त घेण्यात आले. मात्र त्यानंतर तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. यानंतर रक्त तपासणी करणाराने कुटुंबीयांसह कोरोना तपासणी केली. त्यात ते सर्व निगेटिव्ह निघाले. यानंतर मात्र या कुटुंबीयांनी नवसपूर्ती केल्यासारखे पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात एका नागरिकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याने दोन दिवसापूर्वी एका ठिकाणी साखरेची रक्त तपासणी केली होती. त्यानंतर ती व्यक्ती कोरनाबाधित असल्याचे समजले. यानंतर रक्त तपासणाºया चालकाचे धाबे दणाणले. या रक्त तपासणी करणाºया चालकाने आपल्या घरातील सर्व मंडळींची जिल्हा आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घेतली.
चाचणीचा अहवाल येईपर्यंत व त्याचे कुटुंब तसेच संपर्कातील सर्व मित्र यांना मोठी धडकी भरली होती. मात्र मंगळवारी (दि.१४ जुुुलै) संध्याकाळी त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.