अहतदनगर : प्रभाग कोरोनामुक्त करण्यासाठी नगरसेवकांनीच पुढाकार घेतला असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटिजेन चाचणी मोहीम गुरुवारी सुरू करण्यात आली.
अहमदनगर मनपा व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटिजेन चाचणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, डॉ. माधुरी गाढे, पल्लवी सगळगिळे, विकास खरात, पंकज भांबळ, वैभव थोरात, बाबा डिसोजा, विपुल घोडके, आकाश महागन, दिलावर पठाण, ज्ञानेश्वर कासवत, शंभू जपकर, किरण आडोळे आदी उपस्थित होते. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोराडे म्हणाले, कोरोनाच्या अँटिजेन तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मदत होईल. चाचणीमुळे प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार असून, नागरिकांनी न घाबरता चाचणी करून घ्यावे, असे आवाहन बोरुडे यांनी केले.
...