कोपरगाव : तालुक्यातील संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात सुमारे ४०० बेडच्या कोविड केअर सेंटर उभारण्यात असून सोमवारी (दि. २६) लोकार्पण करण्यात आले.
संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार बरोबरच मानसिक आधार देण्याचे काम येथून होणार आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी पौष्टिक आहार बरोबर वैद्यकीय मार्गदर्शन, औषध, वाफेचे मशिन, अंडी, आयुर्वेदिक काढा, हळदीचे दूध याबरोबर मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराबरोबरच रूग्णांला सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. या कोविड सेंटरमधून अनेक रूग्ण लवकर बरे व्हावेत हाच उद्देश आहे. परंतु, दुर्दैवाने एखाद्या रुग्णाला अन्यत्र हलविण्याची आवश्यकता भासली तर त्यांनी वैद्यकीय सहाय्यता केंद्राद्वारे रक्तपेढ्या, ऑक्सिजन बेड आदी सुविधा असलेल्या रूग्णालयाची माहिती ही या ठिकाणाहून देण्यात येणार असून लवकरच स्वतंत्र ऑक्सिजन बेडची सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत.
यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तहसीलदार योगेश चंद्रे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैशाली बडदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वैद्यकीय असोसिएशनचे डाॅ महेंद्र गोंधळी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके आदी उपस्थित होते.
..............
कोपरगाव तालुक्यातील या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शन तसेच बेड उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत, असून अपुऱ्या सुविधा अभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून संजीवनीने पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळवून देण्याचे काम केले आहे.
- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार, कोपरगाव
---------------------