नेवासा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे स्वर्गीय आमदार वकीलराव लंघे पाटील फाउंडेशनच्या वतीने पन्नास बेड क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन सोमवारी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरसगाव व पंचक्रोशीतील रूग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिरसगाव येथील मातोश्री सुलोचनाबाई वकीलराव लंघे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या जागेत हे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला. रूग्णसेवेच्या पुण्याच्या कार्याला सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून हातभार लावावा, असे आवाहन यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
याप्रसंगी नवनाथ महाराज मुंगसे, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. तेजश्री लंघे, छगनराव खंडागळे, नवनाथ देशमुख, संजय खरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. संजय तावरे, सुनील वाघमारे, वसंत देशमुख, अरुण देशमुख, संतोष काळे, शहाजी गाडेकर, दत्तात्रय पोटे, प्रदीप ढोकणे उपस्थित होते. दत्तात्रय पोटे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक विठ्ठलराव काळे यांनी आभार मानले.