बाळासाहेब काकडेकाष्टी : काष्टी येथील जनावरांच्या आठवडे बाजारात हरियाणा राज्यातील गायी,म्हशी खरेदी विक्रीसाठी येऊ लागल्याने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात दुपटीनेवाढ झाली आहे.नव्या पाहुण्यांमुळे दहा एकरात जनावराां बाजार फुलला आहे. काष्टीच्या जनावरांच्या आठवडे बाजारास सुविधांअभावी उतरती कळा लागली होती. उपसभापती वैभव पाचपुते व संचालक मंडळाने समितीचे सचिव दिलीप डेबरे व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सुविधांबाबत सूचना दिल्या. सुरूवातीस ७०० झाडांचे रोपण केले. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची टाकी दुरूस्त केली. व्यापारी शेतकरी व जनावरांना शुध्द पाणी पुरविण्यासाठी आर ओ सिस्टीम बसविली. व्यापारी, शेतक-यांना दोन रूपयात एक लिटर थंड पाणी, जनावरांसाठी ५ रूपयांमध्ये २० लिटर पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिली. त्यामुळे परप्रांतातील व्यापारी, गायी म्हशी घेऊन बाजारात येऊ लागले आहेत. सहा महिन्यांपासून गुजरात राज्यातील गिर गायी विक्रीसाठी येऊ लागल्या. गेल्या महिन्यापासून हरियाणातील ३० व्यापारी म्हशींची २५० पारडी विक्रीसाठी घेऊन येत आहेत. यासाठी बाजार समितीने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे शेतकºयांना कमी दराने पारडी मिळू लागल्या आहेत. त्यातून शेतक-यांचा म्हशी खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.बाजार समितीच्या जनावरांच्या आठवडे बाजारात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर बाजारात सुमारे दोन कोटींचे व्यवहार होऊ लागले आहे. त्यामुळे बाजार समितीला दर बाजार मिळणारे ७० हजाराचे उत्पन्न १ लाख ३५ हजारांच्या घरात गेले आहे.अंतर्गत रस्ते डांबरीकरणगेल्या वर्षी केलेले वृक्षारोपणाचे रिझल्ट घेऊ लागले आहेत. एका वर्षात बाजार वनराईने बहरणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात यांचा विशेष फायदा होणार आहे. लवकरच हॉटेलवाल्यांना एका बाजूला शेड बांधून देणार आहे. अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचा मानस आहे. हा बाजार राज्यात नंबर एक करण्यासाठी जीवाचे रान करणार आहे. -वैभव पाचपुते, उपसभापती बाजार समिती.उत्पन्न आणखी वाढविणारजनावरे व शेतकरी हा आठवडे बाजाराचा आत्मा आहे. लवकरात जनावरांसाठी पत्र्याचे शेड व जनावरे धुण्यासाठी शॉवरची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. -दिलीप डेबरे, सचिव श्रीगोंदा बाजार समिती.