दिघे येथील बाजारतळानजीकच्या ओढ्यातील अरुंद पुलादरम्यान अपघाती वळण आहे. या अपघाती वळणावर रस्त्याच्या कडेला शुक्रवारी सकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर (क्र. एमएच ४३, यू ७५५१) उलटून अपघातग्रस्त झाला होता. कंटेनर मुंबई येथून साहित्य घेऊन नाशिककडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होता. या अपघातातून कंटेनरचालक मोहम्मद दिलशाद (रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश ) व क्लिनर असे दोघे जण बचावले. अपघातग्रस्त झालेला कंटेनर उचलण्यासाठी शनिवारी सकाळी क्रेन पाचारण करण्यात आले होते. मात्र कंटेनर उचलत असतानाच क्रेन रस्त्यावर उलटला व क्रेनचा काही भाग कंटेनरच्या हूडवर पडला.
क्रेनमधील रामा रोकडे व नामदेव रामकर ( रा. नान्नज दुमाला ) हे दोघे बचावले. अपघातग्रस्त कंटेनर व रस्त्यावर उलटलेला क्रेन बाजूला घेईपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
( २९ तळेगाव दीघे)