श्रीगोंदा : आयपीएलमधील सुपर किंग्ज या संघाचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे लोकसहभागातून चाललेल्या श्री व्यंकनाथ कोविड सेंटरसाठी १ लाखाची मदत पाठविणार आहे, अशी माहिती उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली.
बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकनाथ येथे सुरू केलेले कोविड सेंटर व कोरोना बाधितांना ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यासाठी केलेला उपक्रमाची सर्वप्रथम ‘लोकमत’ने दखल घेतली होती. त्यानंतर एका इंग्रजी नियतकालिकाने दखल घेतली.
नाहाटा यांच्यावर त्यांनी लेख लिहिला होता. तो लेख ऋतुराज गायकवाड याच्या वाचनात आला. त्यानंतर गायकवाड याने पुण्यातील एका मित्रामार्फत मितेश नाहाटांशी संपर्क साधला व एक लाखाची मदत जाहीर केली. तसेच अन्य खेळाडूंकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले.