अहमदनगर : केडगाव येथे शनिवारी (दि़ ७) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिका-यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरकारी कामात अडथळा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण, क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली. यामध्ये शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड, शिवसेनचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, योगीराज गाडे, विक्रम राठोड यांच्यासह विठ्ठल सातपुते, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, अभिमन्यू जाधव, भैय्या सातपुते (केबलवाला), चंद्रकांत उजागरे, राजू पठारे, पिंटू मोढवे, रमेश परतानी, राऊसाहेब नांगरे, विकी ऊर्फ विक्रम पाठक, संग्राम शेळके, विशाल गायकवाड, दीपक खैरे, नन्नू दौंडकर, शुभम बेद्रे, विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, मुकेश जोशी, बाळासाहेब बारस्कर, रणजित ठुबे, सचिन ठुबे, प्रफुल्ल साळुंके, गोविंद वर्मा, चेतन वर्मा, विकी भालेराव, नयन गायकवाड, सागर दळवी, सागर गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, रमेश भाकरे, दीपक कावळे, सचिन राऊत, दीपक धेंड, सुनील राऊत, रवी वाकळे, मदन आढाव, आदिनाथ राजू जाधव, मनोज चव्हाण, बंटी सातपुते, अंगद महानवर, अशोक दहिफळे, ऋषभ अंबाडे, प्रतीक गर्जे, सुशांत म्हस्के, तेजस गुंदेचा, कुणाल खैरे, नरेश ऊर्फ गुड्डू भालेराव, लंकेश हर्बा, उमेश काळे, अक्षय भांड, दत्ता नागापुरे, गिरीष शर्मा, नितीन चौबे, शुभम परदेशी, सुनील लालबोंद्रे, दत्ता जाधव, मुकेश गावडे, समीर सातपुते, अमोल येवले यांच्यासह ५०० ते ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दंगलीसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात शिवसेना पदाधिकाºयांची हत्या झाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी घरांवर, पोलिसांवर व पोलीस वाहनांवर दगडफेक करत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनाही धक्काबुक्की केली़ मयतांना घेऊन जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका अडवून मृतदेह नेण्यास विरोध केला़ यामुळे वातावरण तणावपूर्ण बनून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला़ याप्रकरणी पोलिसांनी ६७ जणांसह इतर ५०० ते ६०० जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विदु्रपीकरण यासह कलम १४३, १४७, १४८, १४९, २९७, ३०८, ३२३, ३३२, ३४१, ३५३, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र, केडगाव येथेही झालेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. याकडे ‘लोकमत’ने सोमवारी ‘नगरला काय चालले आहे?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर पोलिसांनी केडगाव तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल केला.