शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

दहिफळमधील शेतकऱ्यांविरुध्द गुन्हे

By admin | Published: May 14, 2016 11:48 PM

शेवगाव : जायकवाडी जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी अनधिकृतपणे उपसा करण्यास रोखणाऱ्या तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली

शेवगाव : जायकवाडी जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी अनधिकृतपणे उपसा करण्यास रोखणाऱ्या तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व अधिकाऱ्याच्या अंगावर व गाडीवर डिझेल टाकून जाळून टाकण्याची चिथावणी दिल्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील दहिफळ येथील संजय विश्वनाथ शिंदे यांच्यासह दहा ते अकरा लोकांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोपान घुले, शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या चराच्या कामाच्या पाहणीसाठी गेले असता दहिफळ गावाच्या शिवारात चराच्या बाजूला २०० ते २५० मीटर अंतरावर साधारण १५० ते २०० विद्युत मोटारी धरणाच्या पाण्यामध्ये टाकून काहींनी शेतीसाठी अनधिकृतपणाने पाण्याचा उपसा चालविण्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवल्याने शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यास बंदी असल्याने संबंधीत शेतकऱ्यांना या अगोदरच पाण्याचा उपसा करू नये, याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. तरीही पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकारी, शेतकऱ्यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात असताना दहिफळ येथील काही शेतकऱ्यासमवेत आलेल्या संजय शिंदे यांनी तुम्ही पाणी कसे बंद करता? धरणासाठी आमच्या हजारो एकर जमिनी गेल्या. आम्ही त्यासाठी त्याग केलेला आहे, असे म्हणून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी संबंधित सरकारी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्राफोडलेल्या पाईपलाईनचे पंचनामे करा व संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी वीज पंपांना जोडलेल्या १० ते १५ पाईपलाईन दगड टाकून फोडून टाकल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. अधिकारी तसेच त्यांच्या वाहनावर डिझेल टाकून जाळून टाका, अशी चिथावणी दिल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर केला. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोपान घुले यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी संजय शिंदे यांच्यासह दहा ते अकरा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, दमदाटी व शिवीगाळ करणे, या आरोपावरून रितसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या पाईपलाईन कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता दगड टाकून फोडली. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येईल.-संजय शिंदे, शेतकरी, दहिफळअनधिकृत पाणी उपशाची पाहणी करण्यासाठी गेलो असता शेतकऱ्यांनीच वाद घातला. सरकारी अधिकाऱ्यावर खापर फोडण्यात अर्थ नाही. शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.-दादासाहेब गिते, तहसीलदार