जामखेड : जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह वाहनाचा चालक आणि मित्र चार चाकी वाहनातून फिरत असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चार चाकी वाहन जप्त करून साथरोग प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि़ ७) रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कारमधून (क्र. एम. एच. १२, के. जे.- ३००६) जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल मुकुंद घायतडक, दादासाहेब पोपट कदम (वय ३५), वाहन चालक राजू अकबर आतार (वय ३४, रा. आरोळे वस्ती, जामखेड) हे तिघे लक्ष्मी चौक येथे आले होते. त्यांनी पोलिसांना समाधानकारक उत्तर दिले नाही. याप्रकरणी दीपक शहाजी बोराटे यांनी फिर्याद दिली.
काहीही ऐकून न घेता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याविरोधात लॉकडाऊननंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी सांगितले.