टाकळीमियॉ : मोबाईलवरून मॅसेज का पाठविला, असा प्रश्न विचारीत टाकळीमियॉ (ता. राहुरी) येथील महेश गायकवाड यास घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिलाबाई गायकवाड यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, माझे पती चंद्रकांत व मुलगा महेश हे घरात टिव्ही बघत असताना चौघांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून गिरीष निमसे, अक्षय निमसे, प्रताप निमसे व राजेंद्र निमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अनिल गायकवाड हे करीत आहेत.