कोपरगाव : महाराष्ट्र कृषी विभागाच्यावतीने विनाअनुदानित तत्त्वावर तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे हरभरा पीक स्पर्धेत सहभागी शेतकरी रामभाऊ शिंदे यांच्या शेतात पीक तंत्रज्ञान मेळाव्याचे सोमवारी (दि. १५ ) आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, कृषी पर्यवेक्षक आदिनाथ आरणे, शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे, कृषी सहाय्यक संगीता खंडागळे, अनिल दवंगे, विजय उगले, कैलास शिंदे, अभिजित आव्हाड, सुधाकर शिंदे, दिलीप शिंदे, ज्ञानदेव बोरावके, बापू शिंदे, बाळासाहेब मोरे, अप्पासाहेब शिंदे, सुनील दवंगे, शरद शिंदे, दादासाहेब शिंदे, विजय उगले, रवि रासकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामदास शिंदे यांच्या हरभरा व ऊस या प्रक्षेत्रावर शिवार फेरी काढण्यात आली.
यावेळी अविनाश चंदन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना, आत्मामार्फत प्रगत शेतकरी गट कंपनी स्थापन करावी, पिकाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताचे व्यवस्थापन करावे. शेतकरी बंधूंनी कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल स्मार्ट प्रकल्प यासारख्या अभियानात भाग घ्यावा, यासंदर्भात अविनाश चंदन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. १०० टन ऊस उत्पादन व कांदा पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या विषयावर निलेश बिबवे यांनी सविस्तर माहिती दिली. संगीता खंडागळे यांनी आभार मानले.
........