राशीन : अष्टविनायकांपैकी एक सिध्दटेक (ता.कर्जत) येथील सिध्दीविनायक गणपतीचे अंगारकी चतुर्थीनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवारी रात्री चंद्रोदयापर्यंत तीन लाख भाविक दर्शनाचा लाभ घेतील अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारक योगामुळे भाविकांची दर्शन रांग दीड किलोमीटर लांब गेली होती. दर्शन बारीसाठी देवस्थानच्या व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त करण्यात आला. या चतुर्थीचे दर्शनाचे विशेष महत्व असल्याने सोलापूर, नगर, सातारा, सांगली, पुणे, बारामती जिल्ह्यातून गणेश भक्त आले होते. मंगळवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रिघ चालू झाली होती, ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
सिध्दटेकच्या सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी तीन लाख भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:57 PM