सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील भाजी बाजारातील ग्राहकांची वाढती गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा कोरोना ‘चेन ब्रेक’ करण्यात अडथळा ठरत आहे. परिणामी मंगळवारी सुप्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकाच दिवशी ४६ आली.
गावातील वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजनेबाबत संबंधितांना तातडीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. इतर व्यवसाय बंद पडल्याने रोजगार बाधित झालेल्यांनी फळे विक्री व भाजीपाला विक्रीचा नवीन मार्ग शोधला. परंतु, हा व्यवसाय करताना येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात अपयश आल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. परिणामी, पॉझिटिव्ह रूग्ण संख्येचा आलेख झपाट्याने वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजीबाजार बंद करणे हा त्यावरील उपाय असला तरी त्यामुळे विक्री व्यवसायातून घरातील चूल पेटविण्यात यशस्वी झालेल्यांपुढे पुन्हा प्रश्न निर्माण होणार असल्याचे या व्यावसायिकांनी संगितले.
कारवाई करण्यासाठी दक्षता समिती हतबल होताना दिसत आहे. सांगूनही विक्रेते ऐकत नाहीत. ग्राहकही सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे आता पोलिसांचीच मदत घ्यावी लागेल, असे ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे यांनी सांगितले.
---
०५ सुपा बाजार
सुपा येथील भाजी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झालेली गर्दी.