शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

विसापूर जलशयावर पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 2:34 PM

कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.

नानासाहेब जठारलोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.विसापूर परिसरातीलच नाही तर  नगर, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर भागातीलही काही हौशी पर्यटक जलाशयाला भेट देत आहेत. वॉटर फॉलचा आनंद लुटण्यासाठी खर्च करुन दूरवर जाण्याऐवजी पर्यटक विसापूर जलाशयाचे सांडव्याचे वॉटर फॉलला महत्व देत आहेत. सांडव्याचे तीनशे-साडेतीनशे मीटर लांबीचे सांडव्यावरुन पाणी वहात आसल्याने सांडव्याखाली धबधबे तयार झाले असून सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने गर्दी केले आहे.तरुणांप्रमाणेच महिला व लहान मुलांनी वाहत्या पाण्यात बागडण्यासाठी गर्दी केली आहे.९२७ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आसलेल्या धरणाजवळ सायंकाळच्या पहारी विलोभनीय दृष्य तयार होत आहे.ब्रिटिशकालीन प्रकल्पविसापूर जलाशयाची मातीची भिंत ७४४० फूट म्हणजे सुमारे सव्वादोन किलोमीटर लांब व ८४ फूट उंच आहे. हे धरण बांधताना इंग्रजांनी केवळ दगड व मातीचाच वापर केला. तरीही या धरणातून थेंबभरही पाण्याची गळती होत नाही.  या जलाशयाला शंभर वर्षे पूर्ण झाले असून इंग्रज सरकारने १८९६ ते १९२७ या ३१ वर्षाच्या कालावधीत हंगा नदीवर विसापूर येथे मातीचा बांध टाकून धरण बांधले. १८९६ ते १९०० सालापर्यंत दुष्काळी कामावरील मजुरांकडून काम करुन घेण्यात आले. त्यानंतर १९१७ पर्यंत इतर भागातील मजुरांचा वापर करण्यात आला. १९१७ ते १९२३ या सहा वर्षाच्या कालावधीत विसापूर कारागृहातील बंदिवानांकडून काम करुन घेण्यात आले. त्यावेळी हे धरण बांधण्याठी २१ लाख व कालवा व उपचाºयांच्या कामासाठी १९ लाख असा या प्रकल्पावर केवळ ४० लाख खर्च झाला आहे. या धरणावर २८००० एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारकडून करण्यात आला. अशाप्रकारे जुन्या तंत्राचा वापर करुन २७ किलोमीटर कालव्यांसह काम पूर्ण करुन धरण सर्वप्रथम १९२७ साली ओव्हरफ्लो  झाले. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर फ्रेड्रीक हग सायकस यांचे हस्ते २९ नोव्हेंबर १९३४ विसापूर धरणाचे औपचारिक उद्घाटन झाले. ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा सांडवा बांधलेला आहे.