अहमदनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातल्याने बाजार समिती बाहेर महात्मा फुले चौकात किरकोळ विक्रेत्यांची गर्दी होत असून, ही गर्दी परिसरातील नागरिकांच्या चिंतेचा विषय बनली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली. परंतु, शेतकरी भाजीपाला घेऊन बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या कोठी रस्त्यावर बसतात. शहरातील किरकोळ विक्रेतेही भाजी घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी करत असून, महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई करत विक्रेत्यांना उठविले. त्यामुळे शेतकरी व खरेदीसाठी गेलेल्या किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी बसून दिले जात नसल्याने आम्ही भाजी विकायची कुठे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातली. शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विकता येत नाही. त्यामुळे शेतकरी जिथे जागा मिळेल, तिथे काहीवेळ थांबून भाजीपाल्याची विक्री करतात. प्रशासनाने परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी काही वेळ मुदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. किरकोळ विक्रेत्यांना घरी जाऊन भाजीपाला विक्री करण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु, भाजी आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
...
घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्यांची संख्या घटली
शासनाने भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने घरोघरी विक्री करणाऱ्यांची संख्या रोडावल्याने नागरिकांना भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे.
..
सूचना फोटो आहे