संगमनेर शाखेच्या वतीने सोमवारी विविध विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालयात आयोजित कथाकथन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष दुर्गा तांबे बोलत होत्या. शाखेचे सचिव, ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे, कार्याध्यक्ष शांताराम डोंगरे, अनिल देशपांडे, प्राचार्य एम. वाय. दिघे, कथाकथनकार प्रा. यशवंत फटांगरे उपस्थित होते.
मोठ्या माणसांचे आयुष्य समजावून घेण्यासाठी लहान वयात गोष्टी अधिक उपयोगी पडत असतात. गोष्टींच्या माध्यमातून उद्याच्या युगाला सामोरे जाण्याची शक्ती मिळत असते. महापुरूषांच्या जीवनाची जडणघडण समजावून घेण्यासाठी या वयात कथाकथनासारखे कार्यक्रम उपयोगी पडत असतात. बालकुमार साहित्य संस्थेच्या माध्यमातून डाॅ. संजय मालपाणी यांनी सुरू केलेला कार्यक्रम यंदाही सुरू ठेवला आहे. असेही तांबे म्हणाल्या.
प्रास्तविक प्राचार्य दिघे यांनी केले. एस. एम. खेमनर यांनी आभार मानले.