संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघात रविवारी ( दि. २३) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते. गोरक्ष नवले, संभाजी गुंजाळ, भाऊसाहेब राऊत, बाळासाहेब आगलावे, अर्जुन राऊत यांना चारा बियाणे वाटप करण्यात आले.
थोरात म्हणाले, दूध व ऊस हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. दूध व्यवसायातून ग्रामीण भागात मोठी क्रांती झाली आहे. गोरगरीब कुटुंबीयांना या व्यवसायातून मोठा हातभार लागला आहे. राजहंस दूध संघाने कायम आपली सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना मोठी मदत केली आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र असतानाही एक दिवसही बंद न ठेवता या दूध संघाने सातत्याने दूध स्वीकारले आहे. दूध कमी झाले की एक रुपयासाठी अनेक शेतकरी इतर खासगी दूध संघांना दूध पुरवतात आणि त्यांनी ते घेतले नाही की पुन्हा आपल्याकडे येतात. मात्र, तरीही या संघाने कायम सर्वांना सामावून घेतले आहे.
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच राजहंस दूध संघाच्या माध्यमातून उच्च प्रतीचे मका, ज्वारी, विविध प्रकारचे गवत असे एकूण ११० मेट्रिक टन बियाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.
............
फोटो : थोरात
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटप करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात.