अहमदनगर : पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरून प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटे या विद्यार्थिनीचे गुरुवारी नगरमध्ये अगमन झाले. तिचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापालिकेत स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक संजय शेंडगे, सुवेंद्र गांधी, तुलशीराम पालीवाल, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, राजू नराल, किशोर कानडे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी चिकटे हिने सांगितले की, सायकल प्रवासादरम्यान इंधन बचतीबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांचा सायकलवरून प्रवास केला. गेल्या दहा महिन्यांपासून सायकलवरून प्रवास करत असून, तानसा अभयारण्यात वाघ, चित्ते आडवे आल्याचे प्रणाली चिकटेने सांगितले. मराठवाड्याचा प्रवास करून डिसेंबरमध्ये घरी जाणार आहे. दररोज साधारण ६० ते ७० कि.मीचा प्रवास प्रणाली करते. प्रवासादरम्यान प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर टाळूया , सोबत कापडी पिशवी ठेवूया, वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य होणारी कामे सायकलने करावी. महत्त्वाचे म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ,पाण्याची बचत या कामात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा. जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही, असे आवाहन चिकटे हिने केले आहे.
...
सूचना फोटो २० शेंडगे नावाने आहे.