शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

साईबाबा संस्थानला रोज चार लाखांची देणगी; पावणे दोन कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:40 AM

लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख  रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रमोद आहेर । शिर्डी : लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख  रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.देशातील श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेल्या साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची घट झाली आहे. साईसंस्थानकडे कायम व कंत्राटीसह जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत. वर्षाला पगार आणि बोनसपोटी संस्थानचे १८७ कोटी तर दिवसाला ५० लाख रूपये खर्च होतात. संस्थान प्रसादालयात मोफत अन्नदान करते. यावर वर्षाला ४० कोटींचा खर्च होतो. संस्थानचे दोनपैकी एक रूग्णालय पूर्णपणे मोफत आहे. गेल्या वर्षी या रूग्णालयातून ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले तर १२० कोटी रुपये खर्च झाले. दुर्धर आजारासाठी गेल्या वर्षभरात ७१४ गरीब रूग्णांना तब्बल सतरा कोटी रूपये मदत पाठविण्यात आली. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात पाच हजारांवर विद्यार्थी आहेत. मुलींना मोफत शिक्षण आहे. संस्थानचे शिक्षणावर १४ कोटी खर्च होतात. मात्र या उपक्रमातून फक्त अडीच कोटी रुपये जमा होतात. भक्त निवासामध्ये दरवर्षी अडीच कोटींचा तोटा होतो. दर्शन रांगेत बुंदी प्रसादावरच वर्षभरात वीस कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय रांगेत भाविकांना चहा, बिस्कीटेही मोफत दिली जातात. महिन्याला वीज बील एक कोटीपेक्षा जास्त असते. स्वच्छतेवरही मोठा खर्च होतो. नगरपंचायतीला सुद्धा स्वच्छता व अन्य विकास कामांना मदत केली जाते.मागील वर्षी ५१ कोटींची देणगीमागील वर्षी १७ मार्च ते ३१ मे २०१९ दरम्यान देणगीद्वारे ५१ कोटी ३१ लाख रोख रक्कम, दीड कोटीचे सोने-चांदी, दर्शन-आरती पासेसमधून साडेआठ कोटी रूपये मिळाले होते. यंदा या काळात फक्त तीन ते साडेतीन कोटी रूपये मिळण्याची शक्यता मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केली़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर