विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, कोळगाव परिसरात शनिवारी, रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ऊस पिक जमीनदोस्त झाले आहे.साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु होण्यास अजून तीन आठवड्यांचा अवधी आहे. जमिनीवर सपाट झालेल्या उसाला मोठ्या प्रमाणात उंदीर लागत असल्याने टनेजमध्ये घट होत असते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र हा पाऊस रब्बीचे इतर पिकांना लाभदायक ठरला आहे. विसापूरचे ओव्हरफ्लोचे पाण्यात वाढ झाल्याने हंगा नदीचे पाणी पातळीत वाढ झाली आहे.
विसापूर, कोळगाव परिसरात ऊस पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:36 PM