काष्टी : काष्टी येथील अनिलराव दांगट यांची कन्या प्रियंका व नगर येथील महेश पाटील यांचे चिरंजीव रोहीत यांचा विवाह साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब कुटुंबातील ५ मुलींना दांगट परिवाराने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.लॉकडाऊनमुळे दांगट परिवाराने साखर पुडा कार्यक्रम आयोजित केला. विवाहाचा मुहूर्त नंतर काढण्याचा निर्णय घेतला़ पण मित्र-नातेवाईकांच्या विनंतीमुळे साखरपुड्यातच विवाह लावण्यात आला. या विवाहाची सदैव आठवण रहावी म्हणून दांगट परिवाराने पाच मुलींना शिक्षणासाठी दत्तक व अग्नीपंख फौंडेशनला मदत करणार असल्याचे सांगितले.
काष्टी येथील दांगट परिवाराने कन्येचा विवाह लावून पाच मुलींना घेतले शिक्षणासाठी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 4:24 PM