भाऊसाहेब येवले, राहुरीमोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे राहुरी येथील मुळा नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ पिलर क ॉलम, पाईप कॅप व पाईल्स उघड्या पडल्यामुळे पूल पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़इंग्रजांच्या काळात १९२१ मध्ये मुळा नदीवर पूल बांधण्यात आला होता़ पूल तुटल्यानंतर १९६८ मध्ये नवीन पूल बांधण्यात आला़ या पुलाचे विस्तारीकरण करण्यात आले़ मात्र गेल्या दहा वर्षांपासून पुलाजवळ पूर्व व पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला़वाळू उपशामुळे पुलाचा पाया उघडा पडला आहे़ मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे़ कोणत्याही क्षणी नदी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते़ पुलावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात़ नगर-मनमाड महामार्गावरील या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू असते़ जड वाहनेही मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात़ पुलाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता महसूल विभागाने पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे़मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे़ कधीही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे़ महाडसारखी घटना घडू नये म्हणून महसूल विभागाने पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे़ धोकादायक पुलाची शासनाने दखल घ्यावी़ -प्रसाद तनपुरे, माजी खासदारवाळू उपसा होऊ नये म्हणून नदी पात्रात रस्ते खोदण्यात आले आहेत़ वाळू उचलेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत़ पुलाची पाहणी करून अहवाल पाठविण्यात येईल़-अनिल दौंडे, तहसीलदार राहुरी़
राहुरीतील पुलाचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: August 05, 2016 11:36 PM