जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर शहर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील कौडेश्वर महाविद्यालय व जिल्हा प्राथमिक शाळेत मंगळवारी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे बोलत होत्या. कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध आपल्या घरापासूनच करावा तसेच समाजात वावरताना महिलांनी एकमेकांना आदर द्यावा. दैनंदिन जीवनात सामाजिक बांधीलकीही जोपासावी, असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी केले.
मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक रक्कम पीडितग्रस्तांना मंजूर केली असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक पोपट पवार व सुनंदा ठोकळ तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
शिबिरात ॲड. अनुराधा आठरे-येवले यांनी विद्यार्थ्यांना हुंडा प्रतिबंधक कायदा त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना हुंडा देणार किंवा घेणार नाही, अशी शपथ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण शेरकर यांनी तर विकास कर्डिले यांनी आभार मानले.