श्रीरामपूर : सतरा दिवसांपासून उपचार सुरु असलेल्या सराफ व्यावसायिकाच्या मृत्य झाल्यानंतर श्रीरामपुर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर संतप्त व्यायसायिकांनी मृतदेह पोलिस स्टेशनमध्ये नेत पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस स्टेशनमधून मृतदेह हलविण्यात आला.शहरातील सराफ व्यावसायिक गोरख मुंडलीक यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. १७ दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. संगमनेर येथील पोलिसांनी मुंडलीक यांच्यावर चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप केला होता. हे पोलीस पथक १आॅगस्ट रोजी मुंडलीक यांच्याकडे सोने मागण्याकरिता आले होते. याच तणावातून पोलिसांसमोरच त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.द आज सराफ व्यावसायिकांनी शनिवारी दुपारी दोन वाजता मुंडलीक यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला. दोषी पोलिसांचे निलंबन करा, त्यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. दोन तास मृतदेह ताटकळत राहिला. मोठा जमाव जमलं होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक श्रीहरी बहिरट, संपत शिंदे उपस्थित होते.