याबाबत मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. शहरातील मार्केटयार्ड परिसरात सोनसाखळी, वाहनचोरी तसेच व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम चोरणे आदी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून लूटमार करत आहेत. या घटनांमुळे नागरिक व व्यापऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक विनीत पाऊलबुदे, माजी नगरसेवक अविनाश घुले, संजय चोपडा, किरण पितळे, डॉ. सचिन भंडारी, अभय गुजराती, रजेश भंडारी, प्रशांत मुथा, ईश्वर पोखरणा, राहुरी भंडारी, सचिन भंडारी, प्रवीण कोठारी, महावीर शेटिया, सचिन खुराणा, संजय गुगळे, भूषण भंडारी आदी उपस्थित होते.
फोटो - १९ निवेदन
ओळी- नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना पायबंद घालावा, या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले.