शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

दीनमित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:48 AM

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़

अहमदनगर : दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़ पत्रकार, साहित्यिकांच्या गौरवार्थ आज, रविवारी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात विशेष सोहळा होत आहे़ त्यानिमित्ताने दीनमित्रकारांच्या लोकोत्तर कार्याचे स्मरण करणारा हा विशेष लेख......नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी हे छोटस खेडेगाव़ सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची कर्मभूमी म्हणून स्वातंत्र्य पूर्वकाळापासून हे गाव देशभर परिचित होतं़ ‘दीनमित्र’मधून मुकुंदरावांनी १०० वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात़ त्यांचे विचार शेतकरी वर्गास नवी उमेद देतात तर राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. दीनमित्रकार मुकुंदराव हे उत्तम साहित्यिकही होते. वैचारीक व वृत्तपत्रीय लिखाणासोबतच त्यांनी कादंबरी, खंडकाव्ये, विडंबन व विनोदी वाङमय, लघुकथा, चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या़ तसेच ४०० हून अधिक प्रसंगकथाही लिहिल्या.तरवडीसारख्या खेड्यात १९१० मध्ये सुरू केलेले दीनमित्र हे साप्ताहिक पुढे ५७ वर्षे सातत्त्याने त्यांनी चालवले. दीनमित्रात सुमारे २७५० अग्रलेख व ७ हजार स्फुटे त्यांनी लिहिली. त्यामुळेच मराठी साहित्यासह वृत्तपत्रीय क्षेत्राच्या इतिहासात दिनमित्रकारांचे नाव अग्रभागी आहे. दीनमित्राची दखल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीही घेतली़ याचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. कृष्णराव भालेकर यांच्या निधनानंतर मुकुंदरावांनी दीनमित्र हे साप्ताहिक तरवडीत सुरू केलं आणि चालवलंदेखील.महात्मा फुलेंनंतर सत्यशोधकी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दीनमित्र व मुकुंदरावांनी मौलिक काम केलं. जातीयता, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न, निरक्षरता यावर मुकुंदरावांनी त्यांच्या लेखणीतून सतत कोरडे ओढल्याचे दिसते. ‘आसुडाचे फटके’ या सदरातून त्यांनी ढोंगी उच्चवर्णीयांवरही प्रहार केले.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाला दिलेले तत्वज्ञान समाजातील सर्वस्तरात पोहचविण्याचे काम मुकुंदरावांनी ‘दिनमित्र’च्या माध्यमातून केलं. सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत जखडलेल्या बहुजन समाजाची विचारशक्ती जागवून त्यांच्यात लढाऊ वृत्ती निर्माण करण्याच श्रेयही ‘दीनमित्र’कडेच जातं. धर्म व जातीच्या बंधनातून मुक्त असलेला संपादक कसे विचार पेरू शकतो, हेच ‘दीनमित्रा’तून दिसतं. ग्रामीण भागात असूनही प्रबोधनाची मशाल मुकुंदरावांनी तेवत ठेवली.‘दीनमित्र’ छापण्यासाठी मुकुंदरावांनी त्यांच्या शेतात टाकलेला छापखाना नगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात शीळाप्रेसच्या स्वरूपात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. मुकुंदरावांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी तरवडीत दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीची स्थापना करण्यात आलेली असून मुकुंदरावांचे साहित्य, ‘दीनिमत्र’चे अंक, १८८८ पासूनचे पत्रव्यवहारही जतन करण्यात आलेला आहे.इंग्रजांनी केला दंडदीनमित्रचा छापखाना बिगरशेती जागेत नसल्याने इंग्रज सरकारने या छापखान्यावर जप्ती आणत ७५० रुपये दंड केला होता़ मात्र छत्रपती शाहू महाराजांनी तो दंड भरला़ तसेच मुकुंदरावांना प्रत्यक्ष भेटीचेही निमंत्रण दिले. मुकुंदरावांच्या लग्नात छत्रपती शाहू महाराजांनी पाठवलेल्या फेट्यात अडीच तोळे सोने तर पैठणीत शंभर ग्रॅम चांदी निघाली. मुकुंदरावांच्या एका काव्यग्रंथावरून गदारोळ झाला होता. त्यातून त्यांच्यावर पुण्याच्या न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला. हे डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना समजताच त्यांनी त्वरित मुकुंदरावांना तार पाठवून हा खटला लढण्यासाठी वकिल म्हणून मी येऊ शकतो, असे तारेत म्हटले होते़ मात्र पुढे हा खटला तक्रारदारनेच मागे घेतला़ तारेची ती प्रतही जतन करण्यात आलेली आहे.देश-विदेशातील संशोधकांनी लिहिले प्रबंधदीनमित्र व मुकुंदरावांवर आतापर्यंत देश-विदेशातील ३४ संशोधकांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली आहे़ त्यात कॅलिफॉर्नियाच्या गेल आॅम्वेट व जर्मनीच्या रूझी लँड यांचाही समावेश आहे. ‘दीनमित्र’ने कुलकर्णी यांच्या वतनाबद्दल सातत्याने लिखाण केलं. त्यामुळे त्याकाळी विधिमंडळात मोठा खल झाला़ त्यानंतर कुलकर्णी वतन बंद करण्याचा व तलाठी नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यातील ही महत्वाची ऐतिहासिक घटना मानली जाते. हा बदल तरवडीतून प्रकाशित झालेल्या दीनमित्राने घडवला.

अनिल गर्जे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर