तालुक्यातील तळणी शिवारातील एका वस्तीवर बुधवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास एक काळवीट जातीचे हरण जखमी अवस्थेत फिरताना अनेकांनी पाहिले होते. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास त्या काळविटाच्या मागे कुत्रे लागल्याने जिवाच्या भीतीने हे काळवीट एका घरात शिरले. यावेळी ग्रामस्थांनी पत्रकार रामनाथ रुईकर व अनिल साठे यांना माहिती दिली. साठे यांनी याबाबत वनविभागातील कर्मचारी आप्पा घनवट यांना संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी पाच मिनिटांत तिथे पोहोचतो असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र संबंधित कर्मचारी उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या काळविटाला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी त्या काळविटाचा मृत्यू झाल्याचे समजले.
--------
वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते काळवीट घटनास्थळी ताब्यात घेऊन त्याच गावाच्या जवळील एका गो शाळेच्या गोठ्यात आणून ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने त्याचे शवविच्छेदन करून पुरल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी गोशाळेत काळवीट का ठेवले, जखमी काळविटाला तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना का दाखविले नाही. याबाबतचा काळविटाचा मृत्यू अहवाल कार्यालयास सादर करून नोंद घेण्यात आली आहे का.? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
140621\img-20210609-wa0052.jpg
हेच ते मृत पावलेले जखमी काळवीट तळणी येथील एका जणाच्या घरात आश्रयाला बसले होते.