अहमदनगर : राहुरी तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याजवळ मुळा नदीपात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली़डिग्रस बंधाऱ्याजवळ सोमवारी वाळू उपसा सुरु होता़ मच्छिंद्र जालू जाधव व ज्ञानदेव जालू जाधव हे दोघे सख्खे भाऊ ठेकेदाराकडे वाळूचे ट्रॅक्टर भरण्याचे काम करीत होते़ दरम्यान एका मोठ्या ढिगाऱ्याखाली दोघेही गाडले गेल्यामुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला़ तर दोघेजण जखमी झाले आहेत़ ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली़ मयत जाधव बंधू हे राहुरी तालुक्यतील बारागाव नांदूर येथील रहिवासी आहेत़ मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून, अनेकदा वादावादीचे प्रकारही नदीपात्रात घडत असतात़ परिसरातील ग्रामस्थ व वाळू तस्कर यांच्यातील सघर्ष नित्याचाच झाला आहे़ मात्र, तरीही वाळू तस्करी सुरुच आहे़ दरम्यान जाधव बंधूचा मृत्यू वाळू तस्करीतून की अन्य कारणातून झाला, याचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे़ अद्याप याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़
वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: July 17, 2017 6:12 PM