संगमनेर : रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन मोदी सरकारने कर्जमुक्त केले. मग लघु उद्योजक, छोटे व्यापारी, शेतक-यांना कर्जमुक्त का केले नाही? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे केला.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी (१९ जून) कोरोनासोबत लढा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार आदीचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी तांबे बोलत होते.
ते म्हणाले, एकीकडे बलाढ्य उद्योगांना केंद्र सरकार मदत करताना रिलायन्स आता कर्जमुक्त झाली आहे. दुसरीकडे आर्थिक मंदी, कोरोनामुळे ढसाळलेली अर्थव्यवस्था यामुळे लघु व मध्यम उद्योग, छोटे व्यापारी, शेतकरी चिंतेत आहेत. त्यांचावरही कर्जाचा डोंगर वाढतो आहे. त्यांनाही मदत करण्याची गरज असल्याचे तांबे यावेळी म्हणाले.