अहमदनगर : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात पुन्हा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून, आधार प्रमाणिकरण करण्यास जिल्ह्यातील बँकांनी सुुरुवात केली आहे़.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले़ त्यामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली होती़ गेल्या तीन महिन्यांपासून कर्जमाफी योजना थांबविल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला होता़ परंतु, सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी केला़ सरकारने यापूर्वीच लॉकडाऊनच्या काळात उर्वरित पात्र २८ हजार शेतकºयांची यादी पोर्टलवर प्रसिध्द केली होती़.
या शेतकºयांना सरकारकडून येणे दर्शवून नव्याने पीक कर्ज देण्याचाही आदेश जारी केला होता़ परंतु, बँकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे सरकारने आधार प्रमाणिकरणास हिरवा कंदील दाखविला असून, तशा सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत़ जिल्हा सहकारी बँकेने शाखांमध्येच आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध केली असून, दोन दिवसांत १० हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे़ इतर व्यापारी बँकांनीही आधार प्रमाणिकरण करून शेतकºयांना तातडीने नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत़.---
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना नवीन कर्ज वाटप करण्यात येत आहेत़ तशा सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत़ -संदीप वालवलकर, अग्रणी जिल्हा प्रबंधक
---नियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहन नाहीचसरकारने नियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे़. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून दुुसºया टप्प्यात नियमित कर्जफेड करणाºयांना ही रक्कम दिली जाणार होती़ परंतु, कोरोनामुळे सरकारचा महसूल बुडाला़ त्यामुळे सरकारकडून याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने नियमित कर्जफेड करणाºयांना सरकारकडून मिळणाºया मदतीबाबत साशंकता आहे़