शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासकाबाबत निर्णय; हसन मुश्रीफ यांची माहिती, अण्णा हजारे यांची घेतली राळेगणसिद्धीत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:47 PM

ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणा-या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका  दाखल आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राळेगणसिध्दीत (२४ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पारनेर : ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणा-या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका  दाखल आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राळेगणसिध्दीत (२४ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांच्या भेटीनंतर आपले निम्मे समाधान झाले आहे, अंमलबजावणीनंतर निम्मे होईल, असे अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 अण्णा हजारे-हसन मुश्रीफ, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यात सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीवर नेमण्यात येणारे प्रशासक तसेच ग्रामविकासावर प्रामुख्याने चर्चा झाली. 

ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी  नेमल्यानंतर पुढे काय करायचे यावर सोमवारी न्यायालय निर्णय देणार आहे. त्यानंतरच शासन यावर निर्णय घेईल. उच्च न्यायालयात झालेल्या कामकाजाची माहिती हजारे यांना देण्यात आल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफanna hazareअण्णा हजारेgram panchayatग्राम पंचायत