शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:33 PM

श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.

अहमदनगर : अहमदनगर महापानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.शिवजयंतीच्या तीन दिवस अगोदर म्हणजे १६ फेबुवारी रोजी भाजपच्या श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्त्तव्य केले होते. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले़ त्यानंतर छिंदम याला पक्षातून काढून टाकण्यात आले. तसेच उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला. छिंदमला १६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. सध्या तो नाशिक येथील कारागृहात आहे. 

छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी विविध संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महापालिकेने सोमवारी विशेष सभा घेतली. हात वर करुन ठराव मंजूर करण्यात आला. सभेला नगरसेवक गणेश कवडे, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, सुवर्णा कोतकर, मनिषा काळे, दत्ता कावरे, दीप चव्हाण आदी उपस्थित होते.या सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे वस्त्र परिधान करुन सभेत छिंदम याचा जोरदार निषेध केला. छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी सर्वांनी सभेत केली. त्याचवेळी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुतळा बसविण्यासाठी नगरसेवकांनी एका वर्षाचे मानधन देण्याची तयारी दर्शविली.

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने सभागृहात करण्यात आली. तर छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन आमदार झालेले छिंदमच्या प्रकरणावर गप्प का, असा सवाल नगरसेवक योगीराज गाडेंनी करीत भाजपावर टीका केली.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाBJPभाजपा