श्रीगोंदा : तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रूग्ण संख्येत घट होत आहे. शुक्रवारी २१७ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तालुक्यातील सक्रिय रूग्ण संख्या १२७ ने कमी झाली असून सध्या ८५७ सक्रिय रूग्ण आहेत.
तालुक्यात ७ हजार ८०४ पैकी ६ हजार ७९६ रुग्णांनी कोरोना मात केली आहे. १५७ जणांचा
कोरोनाने मृत्यू झाला. बाधित रुग्णांची संख्या ९८४ वर पोहचली होती. मात्र दोन दिवसात यामध्ये १२७ ने घट झाली. सध्या ८५७ सक्रिय रूग्ण आहेत.
तालुक्यात कोळगाव, देवदैठण, पिंपळगाव पिसा, घारगाव, बेलवंडी, चिंभळे, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, लिंपणगाव, आढळगाव, श्रीगोंदा, चांडगाव, पारगाव, मांडवगण येथे कोविड सेंटर सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिला मिळाला आहे.
श्रीगोंदा येथील शासकीय तीन कोविड सेंटरमध्ये २३ स्कोअर असलेले काही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शासकीय कोविड सेंटरमधील कोरोना उपचाराविषयी नागरिकांत विश्वास वाढला आहे.
कोरोनाच्या घटत्या संख्येमुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच कोविड सेंटर चालकांचा दैनंदिन ताणही कमी होणार आहे.