श्रीरामपूर : कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी थांबणे पसंत केले. बुधवारी श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याची आवक घटली तरी ५ हजार गोण्यांची आवक होऊन ५ हजार रूपये सर्वाधिक भाव निघाला.गेल्या आठवड्यात ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. बुधवारी यात घसरण झाली. पहिल्या प्रतिच्या कांद्यास ४१०० ते ५ हजार रूपये, दुसऱ्या प्रतिच्या कांद्यास ३१०० ते ४०५० रूपये, तिसऱ्या प्रतिच्या कांद्याच्या १ ते ३ हजार रूपये व गोल्टी कांदा ३१०० ते ४ हजार व खाद कांंद्याचे भाव ७०० ते २५०० रूपये प्रतिक्विंटल निघाले. गोल्टी कांद्याला मागणी चांगली राहिली. २ ते ३ हजार रूपये प्रति क्विंटल कांद्याच्या बाजार भावात घट झाली. परदेशातून भारतात कांदा निर्यात झाल्यामुळे व कांद्याच्या भाववाढीमुळे मोठ्या शहरात ग्राहक ओरडू लागल्याने केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी निर्यातीला परवानगी दिली. यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे मोठा फटका बसत आहे. (वार्ताहर)
श्रीरामपूर बाजार समितीत कांदा दरात घट
By admin | Published: September 04, 2015 12:08 AM