दशमीगव्हाणमध्ये एकोपा, माजी सभापती रघुनाथ झिने यांच्या पिंपळगाव माळवी गावातही केवळ तीनच जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिरढोण गावात ७ पैकी ५ जागा बिनविरोध होऊनही आता दोन जागासाठी निवडणूक रंगणार आहे. आदर्श गाव हिवरेबाजारची निवडणूक सलग सातव्यांदा बिनविरोध होईल असे वाटत असताना तेथे दुरंगी लढत होणार आहे. पोपटराव पवार यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न करूनही त्यात यश मिळाले नाही. दशमीगव्हाण गावात गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न यशस्वी झाले.
....
निलेश लंके यांचे प्रयत्न फेल
आमदार निलेश लंके यांनी नगर तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या गावात बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अकोळनेर वगळता इतर गावांनी त्यांना फक्त चर्चेत झुलवत ठेवले. खडकी, घोसपुरी येथील प्रयत्न यशस्वी होतील असे वाटत असताना तेथेही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.
....
नगर तालुक्याचे अपडेट
ग्रामपंचायत निवडणूक होणारे गावे -५९
बिनविरोध झालेले गावे -०३
निवडणूक होणारे गावे -५६
निवडणूक लढवणारे एकूण उमेदवार -११७२
माघार घेतलेले उमेदवार -८३