केडगाव : नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राहुल जगताप उपस्थित होते .आमदार जगताप म्हणाले, पावसाळा जवळपास संपत आला आहे. मात्र नगर तालुक्यात टक्के ही पाऊस पडला नाही. विहीरी तलाव आताच कोरडे पडले आहेत. खरीप पिकाप्रमाणे आता रब्बीचे पिके ही वाया गेल्यात जमा आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत असुन प्रशासनाने आताच दुष्काळ निवारण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.यावेळी तालुका अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, शहर अध्यक्ष माणिक विधाते, तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष पापामिया पटेल, सागर वाळुंज, अंकुश काळे, राजकुमार आघाव, साहेबराव पाचारणे, अनिल नरोडे, रमेश काळे, सुरत बडे, श्रीकांत शिंदे, गजानन भांडवळकर, वैभव मस्के, विकास झरेकर, मनोज भालसिंग, अक्षय भिंगारदिवे, बाळासाहेब रोहोकले, पवन कुमटकर, अंकुश काळे, रोहिदास शिंदे, गोटू दरेकर, ओंकार गोडळकर आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 2:22 PM