उम्मती फाऊंडेशनचे सोहेल दारूवाला, रईस जागीरदार, नगरसेवक मुक्तार शहा, जोएफ जमादार, उर्दू साहित्य परिषदेचे सलीमखान पठाण, साजीद मिर्झा, रियाज पठाण, यासीनभाई सय्यद, ॲड. आरीफ शेख आदींच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत दुर्गे यांना निवेदन देण्यात आले.
मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये दहा टक्के जागा द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. मुस्लिमांवर होणाऱ्या मॉब लिंचिंगसारख्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे, तर त्या थांबतील, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने शनिवारी राज्यभरातून निवेदने देण्यात आली. फिरोज पठाण, अकबर शेख, अहमद शाह, शाहरुख शेख, मोसिन शाह, रिजवान शेख, हवालदार जोसेफ साळवे आदी उपस्थित होते.