अकोलेसारख्या दुर्गम आदिवासी भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. अकोल्यातील रुग्णांना संगमनेर, लोणी, नाशिक, धामणखेल घोटी, नगर येथे जाऊन एचआरसीटी स्कॅन करावा लागतो. यात रुग्णांना प्रवास, वेळ आणि आर्थिक त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख आणि संजय देशमुख यांनी ही बाब पत्राद्वारे उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिली. यावर आरोग्यमंत्री यांनी ह्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेत हेल्थ कमिशनर यांना पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. अकोलेतील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी अकोले, कोतुळ, राजुर, समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
अकोलेत आरोग्य सुविधा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:21 AM