आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, सदस्य डॉ. निसार शेख यांनी माध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूच्या खाटा खासगी दवाखान्यात उपलब्ध नाहीत. तरीही सर्व खासगी कोविड रुग्णालयांत डॉक्टर दिवसरात्र सेवा देत आहेत. असंख्य अडचणी येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नाहीत. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. आता ऑक्जिसनचा पुरवठा कमी पडला आहे. पुढील आठवड्यात आणखी रुग्णसंख्या वाढणार आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर कमी झाल्याने मागील एक-दोन महिन्यांत त्याचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे आता मागणी वाढल्यानंतर त्याची उपलब्धता कमी होते आहे. सरकारी यंत्रणेने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व साठा निश्चित करावा. नागरिकांनी काळजी घेत नियमांचे पालन करावे. कमीत कमी एक महिन्याचा लॉकडाऊन करावा तरच रुग्णसंख्या कमी होईल.
रेडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:20 AM