अहमदनगर - सकल धनगर समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलय येथे धनगर समाजाच्या विविध मागण्या व ST आरक्षण बाबत निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना दादाभाऊ चितळकर म्हणाले कि राज्यामध्ये अनेक दिवसापासून धनगर समाज या आरक्षण य अंलबजावणीसाठी संघर्ष करत आहे म्हणून धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंलबजावणी करून समाजाला मुख्य प्रवाहात आणून न्याय देण्यात यावा.
धनगर समाजच्या विविध मागण्या खालील प्रमाणे
महाराष्ट सरकारने विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये ठराव करून व धनगर व धनगड हे एकच आहेत अशी केंद्र सरकारला शिफारस करावी.
केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून आद्यदेश काढून आरक्षण देण्यात यावे किंवा राष्टपती यांनी वट हुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे.
महाराष्टतील धनगर समाज गेल्या ६५ वर्षापासून ST आरक्षणाची मागणी करत आहे तरी त्याची रिटपीटिशन उच्च न्यायालयात केस न ४९१९ चालू आहे तरी राज्य सरकारच्या वतीने फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा.
पदोन्नतीस पात्र SC ,ST,OBC,NT,VJNT कर्मचाऱयांना पदोन्नती देण्यात यावी.
पोलिस मेगा भरती तात्काळ सुरु करण्यात यावी
धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने मंजूर केलेला १००० ( एक हजार ) कोटी रुपयांचा निधी तात्काळ वितरित करावा व समाजाला न्याय देण्यात यावा हि विनंती
यावेळी आंदोलन कर्ते धनगरी वेशात घोगंडी ,काठी,फेटा परिधान करून आले होते.यावेळी युवराज हाके ,विलास जाभंळकर ,महेश काटमोरे ,देविदास कोपनर ,शिवाजी नवले ,निवृत्ती पाटील दातीर ,श्रीकांत बाचकर ,कोंडीराम बाचकर ,गौरव भांड ,गणेश सुडके सखाराम सरक ,शशिकला सोलाट ,महेंद्र सोलाट आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते