शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

जि़ प क़र्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Published: August 27, 2014 10:58 PM

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़

अहमदनगर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांना जिल्हा परिषदेचे सदस्य परमवीर पांडुळे यांनी दमबाजी व शिवीगाळ प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़दलित वस्ती सुधार योजनेच्या काम वाटपात अन्याय झाल्याची तक्रार करीत जि़प़ सदस्य पांडुळे यांचा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्याशी मंगळवारी (दि़२६) दुपारी वाद झाला होता़ त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना निवेदन देऊन पांडुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली़ त्यानंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करीत पांडुळे यांचा निषेध नोंदविला़ तसेच या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी काम केले़ याबाबत लंघे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पांडुळे यांनी मंगळवारी समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन दमबाजी व शिवीगाळ केली़ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गलिच्छ आरोप करीत शासकीय कामात अडथळा आणला़ त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, याप्रकरणाची चौकशी करुन पांडुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़ यावेळी विजय कोरडे, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड, रवि भिंगारदिवे, राजू जरे, शिवाजी शिंदे, राजेंद्र थोरात, किशोर सोनवणे, संजय गोसावी, सुहास गोबरे, सुनील सरोदे, सुनील जाधव आदी उपस्थित होते़राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांना निवेदन देऊन परमवीर पांडुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी महासंघाचे गुणवंत खुरंगळे, हर्षवर्धन सोनवणे, बाळासाहेब धनवे, बी़ के़ घोडेराव, किशोर उजागरे, बाळासाहेब गायकवाड, पोपट जाधव, सुनील शिंदे आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)