श्रीगोंदा : राजापूर येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील कार्यकर्ता संतोष शिंदे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा व पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीसह अन्य समविचारी संघटना व कार्यकर्त्यांनी ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, राजापूर येथील कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यावर राजाराम चंदर ढवळे याने पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना हाताशी धरून संगनमताने बेलवंडी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिल्यानंतर, हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात जीवा घोडके, संतोष जौंजाळ, महेंद्र थोरात, प्रमोद काळे, राहुल छत्तीशे, सोमनाथ धुळे, राजाभाऊ जगताप, बबलू ओहोळ, दत्ता माळी, संतोष भोसले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
....................
१५ श्रीगोंदा आंदोलन
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिलेले लेखी आश्वासन स्वीकारताना वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव व इतर.