अहमदनगर : वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरण रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त पोलिसांनी त्यांना अडवले.
हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन केले. यावेळी संघटनेने विविध मागण्या केल्या. सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तीमार्फत विशेष चौकशी समिती गठित करावी. ३० दिवसाच्या आत चार्जशीट (दोषारोप पत्रा) तयार करण्यात यावे, सदर खटला उत्तरप्रदेश बाहेर मुंबई , चेन्नई , कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित मुलीचा अंतिम संस्काराच्या नावाखाली महत्वपुर्ण पुर्नतपासणीचे पुरावे नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व त्यांना आदेशीत करणा-या मंत्र्यावर ३०२,१२० अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. या घटनेतील फिर्यादी व त्यांचे कुंटुबीय व साक्षीदारांना संपुर्ण संरक्षण देण्यात यावे. वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सुचनेने जिल्हयासह राज्य भारत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल , असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, शहर जिल्हा महासचिव सुनिल शिंदे, विजय गायकवाड, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, संदिप गायकवाड यांनी दिला.