केडगाव : नगर -सोलापूर- वांळुज बाह्यवळण रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाला आठवण करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी या रस्त्यावर असणा-या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्त करण्याची आठवण करून दिली. पंधरा दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर संपुर्ण गाव रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार, अशी माहिती नगर बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के यांनी दिली.नगर शहारात होणारी वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी बाह्यवळण रस्ता करण्यात आला. माञ हा रस्ता काही माहिन्यातच खराब झाला. सध्या या रस्त्याची चाळण झाली आहे. वांळुज बाह्यवळण रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणा-या शेतक-याचे या रस्तावरील धुळी मुळे पिकाचे नुकसान होत आहे. या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून जाण्याची वेळ आली आहे. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एखाद्या वाहनाजवळून जाताना गाडी अंगावर येईल अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाला आठवण करून देण्यासाठी वाळुंज येथील ग्रामस्थांनी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले. रस्त्याचा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लागला नाही तर संपुर्ण गाव रस्त्यावर उतरणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर , अनिल मोरे, भाऊसाहेब रोहकले, मारुती दरेकर, संतोष दरेकर, अमोल मते, योगेश दळवी , दादा दरेकर , रमेश दरेकर , बाबासाहेब आंबेकर , कुंदन शिंदे , जगन्नाथ शिंदे, भरत दरेकर, अनिल दळवी, संदिप मोरे उपस्थित होते.
वाळुंज बाह्यवळण रस्त्याची झाली चाळण : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:08 PM
नगर -सोलापूर- वांळुज बाह्यवळण रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाला आठवण करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी या रस्त्यावर असणा-या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्त करण्याची आठवण करून दिली.
ठळक मुद्देग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा : खड्ड्यात वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचे वेधले लक्ष