प्रमोद आहेरशिर्डी : साईबाबा संस्थान दिवसेंदिवस अनेक भक्तोपयोगी सुविधा निर्माण करीत आहेत. असे असले तरी सर्वसामान्य भाविकांसाठी साईदर्शन सुखकर व आनंददायी करण्यात मात्र व्यवस्थापन व प्रशासनला अद्याप म्हणावे तसे यश आले नाही. दुर्दैवाने त्यादृष्टीने गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत़साईबाबा संस्थानला रूजू होणारा अध्यक्ष असो की मुख्य कार्यकारी अधिकारी असो. हजर होताच सामान्य भाविकांचे दर्शन सुखकर करण्याची घोषणा केली जाते. नंतर मात्र ही घोषणा हवेतच जाते. विद्यमान पदाधिकारी व अधिकारीसुद्धा याला अपवाद नाहीत़ डॉ़ सुरेश हावरे अध्यक्ष होण्यापूर्वी दर्शनाला आले होते. तेव्हा त्यांना रांगेत जे धक्के खावे लागले, वाईट अनुभव आले. त्यानंतर त्यांनी शिर्डीला पुन्हा न येण्याचा निश्चय केला होता़ मात्र अध्यक्ष होताच बाबांनीच आपल्याला बोलावून घेतले. आता दर्शन सुखकर करू, असे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते.डॉ़ हावरे यांना आलेला अनुभव आजही अनेकांच्या वाट्याला रोज येतो़ मात्र बहुतांश जण कुटुंबासह असल्याने कुणी तक्रार न करता बाबांची इच्छा समजून कडवट अनुभव घेऊन माघारी जातात़ व्यवस्थापनाने दर्शनबारी प्रकल्पाचा अपवाद वगळता सामान्य भाविकाच्या आनंददायी दर्शनाखाठी किती प्रयत्न केले माहीत नाही. पण टाईम दर्शनाची आणखी एक रांग वाढवून सामान्य भाविकांच्या त्रासात नकळत भरच टाकली़ सध्यातरी या पासेसचा उपयोग केवळ शिरगणती व एजन्सीचे पोट भरण्यासाठीच होतांना दिसतो़ सामान्य भाविक, अपंग, वृद्ध भाविक आपल्या मुला-बाळांना घेऊन या रांगेत जाऊन पास काढतो आहे़ सशुल्क पास काढतांना कुटुंबातील एक जण अनेक जनांचे पास काढू शकतो. पण फुकटच्या टाईम दर्शनाच्या पाससाठी सामान्य भाविकाच्या कुटुंबातील प्रत्येकाला रांग लावावी लागते़ दर्शनबारी झाल्यावर या टाईम दर्शनाचा उपयोग होऊ शकतो. टाईम स्लॉटप्रमाणे भाविकांना दर्शनाला सोडणेही तुर्तास शक्य होईल, असे वाटत नाही़ (पूर्वार्ध)दर्शनासाठी वेगळे गेट निर्माण करण्याची गरजसशुल्क दर्शनातून संस्थानला गेल्या वर्षी जवळपास ६३ कोटी रुपये मिळाले. मात्र या भाविकांना हवा तो सन्मान व सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग तसेच रकमेनुसार वेगवेगळे गेट निर्माण करण्याची गरज आहे़ अनेकदा पैसे मोजूनही हे भाविक तासनतास रांगेत तिष्ठत असतात़ काही वेळा त्यांच्या अगोदर साध्या रांगेतून दर्शन होते़