संगमनेर महाविद्यालयासमोरून निर्मलनगर परिसरातून काही अंतर पुढे गेल्यानंतर नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग लागतो. तेथे उड्डाणपूल आहे. तेथून नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता आहे. हा रस्ता संपल्यानंतर लगेचच तेथे मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्स फेकल्या होत्या. तेथे व्हाईल्सचा मोठा खच पडला होता. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असताना हा गंभीर प्रकार समोर आला. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याची तात्काळ दखल घेतली गेली.
-----------
रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
मोकळ्या जागा, महामार्गाच्या कडेला बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात आणून टाकले जात असल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या होत्या. या प्रकारामुळे रहिवाशांचे आराेग्य धोक्यात येते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
------------
फेकलेले बायोमेडिकल वेस्ट गुंजाळवाडी व घुलेवाडी या दोन्ही गावांच्या सीमेवर होते. गुंजाळवाडी ग्रामपंचायतमार्फत ते नष्ट करण्यात आले. नेमके हे तिथे कुणी फेकले हा तपास अद्याप लागलेला नाही. बाहेरगावाहून कुणीतरी येऊन महामार्गाच्या कडेला हे फेकले असावे, असा अंदाज आहे.
- एम. एन. कोल्हे, ग्रामसेवक, गुंजाळवाडी ग्रामपंचायत, ता. संगमनेर