शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

विकास‘मेरू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 4:19 PM

ऐतिहासिक ५०० वर्षांची परंपरा, पालिकेचा १५० वर्षांचा इतिहास, अनेक धुरंधर नेते नगरला होऊन गेले. पण, या सर्वातून नगरकरांना आठवतात फक्त भाई. नवनीतदास नारायणदास बार्शीकर आणि त्यांची विकासकामातील आगळीवेगळी भाईगिरी. त्यांच्या विकासकामांमुळे आपण त्यांना विकास‘मेरू’ही म्हणून शकतो.

अहमदनगर : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि विचारवंत बासू भट्टाचार्य एकदा युवक बिरादरीच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस नगरला होते. अभिनेते फारूख शेख सुद्धा होते. यांना नगरमध्ये काय दाखवायचं हा प्रश्नच होता. किल्ला-चांदबिबी महाल एक दिवस पाहिला. शहर पहायचं म्हटल्यावर त्यांना आता मनपा इमारत असलेल्या ठिकाणी पूर्वी नगरपालिका गेस्ट हाऊस होते. ‘जलतरंगा’ अतिशय सुंदर कलात्मक पाण्यात तरंगेल असं वाटणारी इमारत. बासूदा पहातच राहिले. नंतर लालटाकीचा पंडित नेहरू पुतळा आणि तेथील म्हैसूरच्या वृंदावनच्या पद्धतीने उभारलेले कारंजे-विद्युत प्रकाशझोत आणि समोरच एशियाड स्मृती असलेला अप्पू हत्ती पुतळा पाहिला. बासूदांनी विचारलं, ‘कौन है यहॉँ लीडर? पुढे वाडिया पार्कला जाताना अमरधाम दाखवले आणि बासूदा सुंदर निसर्गरम्य उद्यानातील अमरधाम पाहून थक्कच झाले. नवनीतभार्इंचं व्हीजन, सौंदर्यदृष्टीला सलाम करून ‘‘यहाँ का मरना भी इतना हसीन है’’ अशा शब्दात भार्इंना भेटायची इच्छा व्यक्त केली. पण भाई तेव्हा मुलाकडे अमेरिकेला होते. बासूदांची अन् भार्इंची भेट झाली असती तर जसा अनिलकुमार लखीना यांचा ‘लखीना पॅटर्न’ बासूदांनी देशभर नेला, तसेच भार्इंच्या बाबतीत घडलं असतं. बासूदा इतकचं म्हणाले, ‘सुधीर, इस भाई को नगर के लोग कभी भुला नही पायेंगे.’शहराची ऐतिहासिक ५०० वर्षांची परंपरा, पालिकेचा १५० वर्षांचा इतिहास, अनेक धुरंधर नेते नगरला होऊन गेले. पण, या सर्वातून नगरकरांना आठवतात फक्त भाई. नवनीतदास नारायणदास बार्शीकर आणि त्यांची विकासकामातील आगळीवेगळी भाईगिरी. कुठलाही वारसा-परंपरा नाही, एका छोट्या सायं. दैनिक लोकयुगचा संपादक, त्यात अपक्ष आणि नगरपालिकेचं बजेट पाच-दहा लाखाच्यावर नसताना कुणी नगराध्यक्ष, आमदार इतकं मोठं काम उभं करू शकतो. एकाच वेळी नगराध्यक्ष-आमदार आणि नगर अर्बन बँकेचा चेअरमन होतो हे कुणालाही स्वप्नवतच वाटेल. पण भार्इंच्या कामाची जंत्री वाचली अन् आजही उभे असलेले त्यांचे प्रकल्प पाहिल्यावर सामान्य माणसाला, आजच्या पिढीला एकच प्रश्न पडतो आणि तो म्हणजे जे भार्इंना अपक्ष असताना जमले ते आजच्या नेत्यांना सत्ता-निधी सगळं असताना का जमत नाही?आज भार्इंना आपल्यातून जाऊन आठ वर्षे झाली. त्यापूर्वी ३० वर्षे ते राजकारण आणि नगरपासूनच दूर होते आणि त्यापूर्वी ४० वर्षे ते नगरच्या राजकारणात सक्रिय होते. मात्र इतक्या कालावधीनंतरही लोकांना विकास म्हटलं की फक्त आठवतात भाई. नगरचे शिल्पकार म्हणून उल्लेख होतो तो फक्त भार्इंचा आणि कुठल्याच बाबतीत एकमत होत नसलेल्या सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदारांना भार्इंच्या नेतृत्वाबाबत मात्र एकमत असते. भार्इंचं कर्तृत्व-योगदान आजचे आमदार, खासदार, मंत्री, महापौर सगळेच जाहीरपणे मान्य करतात आणि भार्इंनंतर नगरला काहीच झालं नाही. नगरची दुरवस्था कोण थांबवणार? कोण देणार भार्इंसारखं नेतृत्व याची चर्चा जाहीरपणे होते.भार्इंनंतर काहीच झालं नाही असं मी म्हणणार नाही, पण भार्इंसारखे काम होऊ शकलं नाही हे मान्यच करावे लागते. २३ नोव्हेंबर २०११ ला भाई आपल्यातून गेले. त्यांच्या निधनानंतर आठ वर्षात  भार्इंची जयंती १३ जानेवारी आणि २३ नोव्हेंबर पुण्यतिथी असते. भार्इंच्या नावाने देण्यात येणाºया नगरभूषण पुरस्काराचा कार्यक्रम नगर व्यासपीठ,  नवनीत विचार मंचच्या वतीने आयोजित करण्यात येतो. भार्इंच्या कार्याची माहिती आजच्या  पिढीला, कार्यकर्त्यांना व्हावी, आणि खुंटलेला नगर विकास या कार्यक्रमाचा विषय असतो. नवनीतभार्इंनंतर नगरला नेतृत्व कोण देणार? विकासाची कोंडी कोण फोडणार? अशा विषयावरील चर्चासत्रात भार्इंनंतरचे नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. तसेच पद्मश्री अनिलकुमार लखीना, पोपटराव पवार, ‘सरहद्द’चे संजय नहार, अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे, बाळासाहेब विखे, बाळासाहेब थोरात, गोविंदराव आदिक, दिलीप गांधी सगळेच मातब्बर नेते सहभागी झाले होते. भार्इंच्या गावाची दुरवस्था कशी थांबणार? असा प्रश्न पोपटराव पवार करतात, तर नगरकरांना स्वप्न पडतात की नाही? नगरच्या नेत्यांना झोप कशी येते असा प्रश्न पद्मश्री अनिलकुमार लखीना विचारतात. भार्इंचे नेतृत्व आणि विकास कामे आता स्वप्नवत वाटतात असेच गौरवोद्गार सगळे काढतात.खरचं काय केलं नाही भार्इंनी नगरसाठी? तीव्र पाणी टंचाईने नगरला कुणी मुली द्यायला तयार नसायचे. उद्योगधंदे वगैरे येणे तर दूरच. लातूरसारख्या विलासराव देशमुखांच्या शहरासह अनेक महानगरांना रेल्वेने पाणी आणावं लागलयं. जर भार्इंनी मुळा धरणाचे पाणी नगरला आणलं नसतं तर? आज काय अवस्था असती शहराची? ३४ किलोमीटर असलेल्या मुळा धरणातून भार्इंनी पाईपलाईनने नगरला पाणी आणले. ‘मुळा’च्या पाण्यापाठोपाठ  या नगरीला उद्यमशीलतेकडे नेणाºया एमआयडीसीची मुहूर्तमेढ भार्इंनी रोवली. उघडी गटारे, सर्वत्र ड्रेनेजची दुर्गंधी ही नगरची सकाळ. मात्र हे चित्र भार्इंनी बदललं. कुठलंही बजेट पालिकेकडे नसताना भुयारी गटार आणि पाणी योजना एकाच वेळी राबवली. मोठ्या कौशल्याने आणि राजकीय चतुराईने यासाठी शासनाचा निधी मिळवला. तेव्हा भार्इंनी मुख्यमंत्र्यांना फसवलं अशी टीका विरोधकांनी केली. मंजुरी नसताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन केले. शंकरराव चव्हाणांसारखा कठोर प्रशासक मुख्यमंत्री असताना ड्रेनेज आणि पाणी योजनेसाठी ६ कोटींचा निधी मिळवला. आता सावेडीची भुयारी गटार योजना आणि फेज-२ पाणी योजना विलासरावांनी दहा वर्षांपूर्वी मंजूर करून अजूनही होत नाहीये.भाई नुसते एमआयडीसी आणून थांबले नाहीत. येथे औद्योगिक ग्रोथ सेंटर स्थापन झाले. एकेका उद्योजकाला भेटून नगरला किर्लोस्कर, क्रॉम्प्टन, गरवारे, लार्सन टुब्रो, सह्याद्री, ड्रिलकोसारखे मोठे उद्योग आणले. हजारो तरुणांना रोजगार मिळाला. लालटाकी पुढे सावेडी, गुलमोहर रोड, पाईपलाईन रस्ता नगर बहरत गेलं. गृहनिर्माण मंडळ, सिव्हील हडको, पाईपलाईन, प्रेमदान हडको अशा हजारो घरकुलांच्या योजना आल्या. सिद्धार्थनगर, बागरोजात नगरपालिका कर्मचाºयांना मालकीची घरकुले मिळाली. दिल्ली दरवाजा वेशीच्या बाहेर कुणी सायंकाळी जायचं नाही. आजचं हे चित्रच भार्इंच्या कार्याची पावती आहे.भार्इंच्या विरोधकांचं कौतुकचं करावं लागेलं. किती जागरूक होते ते. भार्इंनी अनेक उद्योजकांना नगरला यावे म्हणून फोन केले होते. पालिकेचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला पुण्या-मुंबईला जायचे. या फोनवर आणि पुणे-मुंबई भेटीचा त्यावेळचा काही शेकडा-हजारात असलेला खर्च भार्इंकडून वसूल करावा म्हणून पाठपुरावा, तक्रारी झाल्या. नेहरू मार्केटवर सकाळी-रात्री शहनाई होत असे. पालिकेच्या बातम्या सांगितल्या जात. विरोधक त्यांची  बीबीसी (बार्शीकर ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन) म्हणून चेष्टा करत. पण नगरकरांसाठी पालिकेचे कार्यक्रम, सूचना त्यावरच मिळत. सुंदर भजने-गाणी त्यावर ऐकायला मिळत. यासाठी पालिकेने एक मर्फी टेपरेकॉर्डर घेतला होता. काय किंमत असेल या टेपरेकॉर्डरची पण भार्इंनी खरेदीत कमिशन घेतल्याचा आरोप आणि शासनाकडे तक्रारही झाली होती. जन्मापासून मरणापर्यंतच्या शेकडो योजना राबवताना या जागरूक विरोधकांचा किती सामना करावा लागेल.आज पालिकेला आखाडा म्हटलं जातं. भार्इंच्या काळातही मोठे-मोठे पहिलवान राजकारणात होते. पण अतिशय राजकीय चातुर्याने भार्इंनी आपलं इप्सित साध्य केलं. त्याचं कारण त्यांचा एकच पक्ष होता. तो म्हणजे नगर शहर आणि शहर विकास हेच एकमात्र ध्येय असे. भार्इंच्या कार्याबाबत अगदी सहज  सांगितले जाते. जन्मापासून मरण्यापर्यंत, माणसाला जगण्यासाठी ज्या सुविधा लागतात जसे, दवाखाना, उद्यान, मंगल कार्यालये, व्यायाम शाळा, क्रीडांगण, पुणे रस्त्यावरचा रेल्वे उड्डाण पूल आणि नगरपालिकेच्या १६ शाळा. ज्या दर्जेदार शिक्षण देत. मला आठवतं अनेक मोठी व्यक्तिमत्त्व पालिकेच्या शाळातून शिकली. नेहरू मार्केट मंडई आठवतेय. जी इमारत पाडायला अभियंत्यांची फौज आणि चार-चार जेसीबी आठवडाभर धडका मारत होते. माळीवाडा, गंजबाजारात प्रशस्त सुसज्ज इमारतीत मंडई होत्या. माळीवाडा मंडई तर रात्रीतून पाडण्यात आली. आजही कुणी पाडली हे गुलदस्त्यातच आहे. रंगभवनसारखं नाट्यगृह, महावीर कलादालन, सुसज्ज आर्ट गॅलरी, सौभाग्य सदन, रंगारगल्लीसारखी मंगल कार्यालये गरजूंना पाच-पन्नास रूपयांच्या भाड्याने मिळत. वाडिया पार्क, सिद्धीबाग उद्यान, सिद्धीबागेचा जलतरण तलाव, जवाहर स्टेडियम, कुस्तीसाठी स्वतंत्र मैदान.सांगायचं किती आणि काय काय? आज जे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह राष्ट्रपुरुषांचे प्रेरणादायी पुतळे-स्मारक दिसतात. ते भार्इंच्याच काळातील. भार्इंचं व्यक्तिमत्त्वच वेगळं होतं. जेथे जाऊ तेथे कामाचा ठसा उमटवू, असा त्यांचा खाक्या होता. आता विधानसभेचीच कारकिर्द पहा.. भाई अपक्ष आमदार होते. मात्र त्यांची कारकिर्द अतिशय गाजली. राज्यातले लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न भार्इंकडे घेऊन येत अन् भाई ते प्रभावीपणे विधानसभेत मांडत. मार्गी लावून घेत. नगरचे तर शेकडो प्रश्न त्यांनी आमदार म्हणूनच मार्गी लावले. नगरच्या योजनांसाठी त्या काळात या अपक्ष आमदाराने किती कोटींचा निधी आणला हे एकदा खरचं पहावं लागणार आहे. ‘मुळा’चे पाणी नगरला आणणे, स्वतंत्र पाणी योजना, भुयारी गटार योजना, रेल्वे उड्डाण पूल, नगरच्या सर्व रस्त्यांचं डांबरीकरण, अशी कामे त्यांनी केली.पालिकेतला घोडेबाजार, गटबाजी, भ्रष्टाचार संपुष्टात आणणारा निर्णय त्यांनी विधानसभेत मंजूर करून घेतला. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा विषय मंजूर करून घेतला आणि नगरच्या पालिकेचे ते थेट जनतेतून पहिले नगराध्यक्ष झाले. हा विकासाचा डोंगर त्यामुळेच ते उभा करू शकले. तिसरी घाट योजना, नाणेघाट, मुंबई रस्ता, नगर-कल्याण माळशेज घाट मार्गे रस्ता, रेल्वेचे अनेक प्रश्न, परळी-कल्याण रेल्वे असे कितीतरी प्रश्न भार्इंनी मांडले.भार्इंचा एखाद्या विधेयकावरील सहभाग, भाई बोलणार म्हटल्यावर सभागृह खचाखच भरलेले असायचे. मंत्रीही अलर्ट असायचे. भार्इंचं भाषण म्हणजे पर्वणीच. वक्तृत्वावर प्रभूत्व आणि विषयाचा अभ्यास. त्यामुळे मंत्री अधिकाºयांची बोलती बंद होई. वसंतराव नाईकांसारखा मुख्यमंत्री जाहीरपणे सभागृहात ‘भाई, तुम्ही आमच्या म्हणजेच सरकारच्या बाजूला या, सरकारमध्ये (मंत्री) व्हा,’ असे जाहीर निमंत्रण देत. बॅ. अंतुले, रामराव आदिक, शंकरराव चव्हाण आदी त्यांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून आग्रह धरत. भाई मात्र मला जनतेने अपक्ष निवडून दिलंय. मी जनतेशी प्रतारणा करणार नाही, असे उत्तर देत विनंती नम्रपणे नाकारत.१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत भाई उभे राहणार म्हणूनच चर्चा सुरू झाली. काँग्रेस धास्तावली. अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर इतर नेते भार्इंची कुठलीही अट मान्य करायला तयार होते. याच तडजोडीतून नगरसाठी ६ कोटींचा निधी ड्रेनेज, पाणी योजनेसाठी मिळाला, अशी त्यावेळी चर्चा होती. भाई जेव्हा विधानसभेला उभे राहिले तेव्हा भार्इंचा (दै. लोकयुगचा) फोन बिल न भरल्याने तोडला होता. एकदा तर लाईटही कट झाली होती. अशा परिस्थितीत भाई सर्व धनाढ्य- बलाढ्य शक्ती, पक्ष विरोधात असताना निवडून आले. सामान्य जनमाणसावरचा प्रचंड प्रभाव हीच त्यांची शक्ती होती. भार्इंच्या दोन चार जाहीर सभा झाल्या की निवडणूक संपली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तर अक्षरश: सहा विरोधी मातब्बर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तीच गोष्ट अर्बन बँकेच्या निवडणुकीत दिसून येते. ४० वर्षे भाई संचालक आणि १४ वर्षे चेअरमन होते.  व्यापाºयांची अर्बन बँक त्यांच्याच काळात सामान्यांची झाली. व्यापाºयांना कोटीची कर्जे देतानाच हमाल मापाडी, भाजी विक्रेते, चर्मकार अशा गरीब घटकांना सहजपणे कमी व्याजात कर्ज मिळे. बँकेच्या सेवकांच्या शहराच्या सर्व भागात सोसायट्या आहेत. ९० टक्के सेवक स्वत:च्या बंगल्यात राहतात. आपला सेवक ज्याच्या जीवावर संस्था उभी आहे तो सुखी-समाधानी असलाच पाहिजे हा भार्इंचा आग्रह. देशातल्या नागरी बँक फेडरेशनने त्यांना अध्यक्ष केलं. भार्इंचा जातीय-धनाढ्य समीकरणात पराभव झाला. भाई राजकारणापासून  दूर झाले. मुलगा अजित मोठा उद्योगपती, तो अमेरिकेत स्थायिक. त्याने भाई आणि भाभी सौ. विजयाताई बार्शीकर (भार्इंची सावलीच) यांना अमेरिकेला नेण्याचा निर्णय घेतला. भार्इंना नाईलाजाने तो स्विकारावा लागला. अतिशय उद्विग्न मनस्थितीत भार्इंना निरोप समारंभाच्या  वेळी नगरभूषण नवनीत हा सन्मान देण्याचा भव्य कार्यक्रम मी लोकयुग आणि बँकेतील मित्रांच्या सहकार्याने घेतला.राज्यातले सर्व मातब्बर नेते उपस्थित होते. या निरोपाच्या कार्यक्रमात भार्इंनी कार्यालय बांधण्यासाठी नगरपालिकेला ३० लाखांचा धनादेश दिला. आणखी लागले तरी देईल, असे जाहीर केले. आणि मी कुठेही असलो. परदेशात गेलो तरी माझ्यावर अंत्यसंस्कार मात्र माझ्या नगरीतच झाले पाहिजेत. मला तशी ग्वाही द्या, भार्इंच्या या मागणीने उपस्थित हेलावून गेले. नगर सोडतानाही त्यांच्या मनात नगर आणि नगरच होते. आणि नगरवरच्या याच निस्सीम प्रेमातून विकास कामाचा चमत्कार त्यांनी घडवला. २३ नोव्हेंबरला भार्इंचं निधन झाले. भार्इंच्या निधनानंतर प्रचंड पाठपुरावा केल्यावर महानगरपालिकेने लालटाकीपुढील सावेडी उपनगराला नवनीतनगर नाव देण्याच्या नगरपालिकेच्या जुन्या ठरावाप्रमाणे सारडा कॉलेजबाहेर ३ बाय २ चा नवनीतनगर फलक लावला. भार्इंची स्मृती जपण्याचा आणि  स्मारक उभारण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी केला. मात्र आज नवनीतनगर फलक गायब आहे. आज नगर शहरात कुठेही भार्इंचा पुतळा, स्मारक तर सोडाच पण रस्त्यालाही नाव नाहीये. अपवाद म्हणून भाई राहतात त्या चौकाला बार्शीकर चौक नावाचा फलक आहे.

लेखक : सुधीर मेहता, ज्येष्ठ पत्रकार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत