मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नगर शहरात फेज-२ योजना तसेच भुयारी गटार अमृत योजनांची सुमारे ३५० कोटी रुपयांचे कामे चालू आहे. सदर कामे अनेक दिवसांपासून रेंगळालेली आहेत. त्यामुळे शहर खड्डेमय झाले असून, शहरात धुळीचे सम्राज्य पसरले आहे. श्वसनाचे विकार व हाडे खिळखिळे झाले आहेत. ढीम्म प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नसल्याने जनतेच्या अब्जावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. याबाबत मुंबई येथील दक्षता व गुणनियंत्रक मंडळामार्फत या सर्व कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच ही प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावून नगरकरांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
----------
फोटो- १३ भगवान फुलसौंदर
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.